भजनी मालिका
← भजनांकडे परत

वाटे उठों नये जीव जाय तरी

vate uthon naye jiv jay tari

रचनाकार: बहिणाबाई · अभंग
वाटे उठों नये जीव जाय तरी । सुख तें अंतरी हेलावलें ॥ १ ॥ आनंदे निर्भर होउनीया मन । करूं आलें स्नान इंद्रायणी ॥ २ ॥ घेतलें दर्शन पांडुरंगमूर्ती । तंव झाली स्फूर्ति वदावया ॥ ३ ॥ तुकोबासी तेथें करुनी नमस्कार । आलें मी सत्वर बिर्‍हाडासी ॥ ४ ॥ बहिणी म्हणे जैसा लोटला समुद्र । ह्रदयाकाशीं इंद्र बोले वाचा ॥ ५ ॥