भजनी मालिका
← भजनांकडे परत

वाढवावा पुढें आणीक प्रकार । एक चि तें फार रुचि नेदी

vadhavava pudhen anik prakar | ek chi ten phar ruchi nedi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वाढवावा पुढें आणीक प्रकार । एक चि तें फार रुचि नेदी ॥१॥ निंच नवें लेणें देह हा पवाडा । पालट रोकडा वरावरी ॥ध्रु.॥ दिसे शोभिवंत सेवेनें सेवक । स्वामीची ते लोकत्रयीं कीर्ति ॥२॥ तुका म्हणे आजी पाववा संतोष । करुनि कीर्तिघोष नाचईंन ॥३॥