भजनी मालिका
← भजनांकडे परत

वाट विस्तारी रुक्मिणी देव बैसले भोजनीं

vat vistari rukmini dev baisale bhojanin

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
वाट विस्तारी रुक्मिणी देव बैसले भोजनीं ।।१।। इतुक्यामध्यें अकस्मात । ध्वनि उमटला कानांत ॥२॥ धांवा ऐकतां श्रवणीं ताट लोटी चक्रपाणी।।३।। उठिला खडबडोनि कैसा पावे बहिणीचिया क्लेशा ।।४।। उभी वृंदावनी बाळा । पुढें देखिला सांवळा ॥५॥ मुगुट कुंडलें मेखळा । वैजयंति वनमाळा ॥६॥ शंख चक्र आयुधे करीं। दिसे घवघवीत हरी ।।७।। झळके पीतांबर कासे नयनीं कोंदला प्रकाशे ।।८।। पाहतां आनंदली मनीं म्हणे नामयाची जनी।।९।