भजनी मालिका
← भजनांकडे परत

युगें गेलीं जरी अपारें । भूमिसी न मिळती खापरें

yugen gelin jari aparen | bhumisi na milati khaparen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
युगें गेलीं जरी अपारें । भूमिसी न मिळती खापरें ॥१॥ ऐसीं पापियांचीं मनें । स्थिर न होतीं कीर्तनें ॥२॥ श्वान घा-तलें पालखीं । वरतीं मान करूनि भुंकी ॥३॥ सूकर चंदनें चर्चिला । पुढती गवसी चिखला ॥४॥ गाढव न्हाणियला तीर्थी । लोळे उकर-डियाप्रती ॥५॥ नामा ह्मणे युगें गेलीं । खोडी न संडिती आपुली ॥६॥