भजनी मालिका
← भजनांकडे परत

युगा ऐसें पळ तुजविण जाय । पाहातोसी काय अंत माझा

yuga aisen pal tujavin jay | pahatosi kay ant majha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
युगा ऐसें पळ तुजविण जाय । पाहातोसी काय अंत माझा ॥१॥ कोमळ ह्लदय तुझें पंढरीच्या राया । कठिण सखया कैसें झालें ॥२॥ विचारिलें चित्तीं दुर्लभ हरिहरा । जाऊं कैसा घरा रंका-चीया ॥३॥ अंगिकारावरी अव्हेराची मात । नव्हे हें उचित देव-राया ॥४॥ मागें जे कां आळी केली वासुदेवा । उदारा केशवा पुर-विला ॥५॥ नुपेक्षिसी आतां भरंवसा चित्तास । आशेची निरास झाली दिसे ॥६॥ वांचोनियां दु:ख भोगावें म्यां आताम । प्राणासी मुक्तता हेंचि भलें ॥७॥ वर्णितां नामा झाला समाधिस्थ । जहालें विदित पांडुरंगा ॥८॥