भजनी मालिका
← भजनांकडे परत

यांसि समाचार सांगतों सकळा । चलावें गोकुळा म्हणे देव

yansi samachar sangaton sakala | chalaven gokula mhane dev

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
यांसि समाचार सांगतों सकळा । चलावें गोकुळा म्हणे देव ॥१॥ देव राखे तया आडलिया काळें । देव सुखफळें देतो दासां ॥२॥ दासां दुःख देखों नेदी आपुलिया । निवारी आलिया न कळतां ॥३॥ नाहीं मेघ येतां जातां देखियेला । धारीं वरुषला शिळांचिये ॥४॥ एवढें भक्तांचें सांकडें अनंता । होय निवारिता तुका म्हणे ॥५॥