भजनी मालिका
← भजनांकडे परत

याहो क्षेत्र केलें जुंपिलीं आउतें । अठारा धान्यें तेथें पेरियेलीं

yaho kshetra kelen jumpilin auten | athara dhanyen tethen periyelin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
याहो क्षेत्र केलें जुंपिलीं आउतें । अठारा धान्यें तेथें पेरियेलीं ॥१॥ मेघ:शाम मेघ वर्षें सर्वा धारीं । बीज विटेवरी सिन्नलें ॥२॥ जगाचें जीवन पंढरी पिकली । चराया सोकलीं भुतें जाणा ॥३॥ घालूनियां माळा रक्षी कळिकाळा । काय कलिमळा संसाराची ॥४॥ पापा सोंकरणें भक्ति हे गोफण । भूस सांडी कण वेंचिताती ॥५॥ वेदशास्त्र ऐसे बोल बोलविता । गूढ वेगळितां लाभ हेती ॥६॥ नामा म्हणे स्वामि विठ्ठल सुकाळ । अन्न ब्रम्हा फळ त्रिभुवनीं ॥७॥