भजनी मालिका
← भजनांकडे परत

युगें आठ्ठावीस जालीं । परी न बैसें तो खालीं

yugen aththavis jalin | pari na baisen to khalin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
युगें आठ्ठावीस जालीं । परी न बैसें तो खालीं ॥१॥ कोण पुण्य न कळे माय । विटे लाधलें या विठ्ठलाचें पाय ॥२॥ नाहीं बोलाचालीअ मौन धरियलें । कैसें चाळविलें पुंडलिकें ॥३॥ एका जनर्दनीं विटेवर । दोन्हीं कटीं ठेविलें कर ॥४॥