भजनी मालिका
← भजनांकडे परत

भावापुढें बळ । नाहीं कोणाचे सबळ

bhavapudhen bal | nahin konache sabal

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भावापुढें बळ । नाहीं कोणाचे सबळ ॥१॥ करी देवावरी सत्ता । कोण त्याहूनि परता ॥ध्रु.॥ बैसे तेथें येती । न पाचारितां सर्व शक्ती ॥२॥ तुका म्हणे राहे । तयाकडे कोण पाहे॥३॥