भजनी मालिका
← भजनांकडे परत

भावबळें कैसा झालासी लाहान । मागें संतीं ध्यान वर्णियेलें

bhavabalen kaisa jhalasi lahan | magen santin dhyan varniyelen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भावबळें कैसा झालासी लाहान । मागें संतीं ध्यान वर्णियेलें ॥१॥ तें मज उचित करूनियां देवा । दाखवीं केशवा मायबापा ॥ध्रु.॥ पाहोनियां डोळां बोलेन मी गोष्टी । आळिंगुनि मिठी देइन पांयीं ॥२॥ चरणीं दृष्टि उभा राहेन समोर । जोडोनियां कर पुढें दोन्ही ॥३॥ तुका म्हणे उत्कंठित हे वासना । पुरवीं नारायणा आर्त माझें ॥४॥