भजनी मालिका
← भजनांकडे परत

भावाचा भोक्ता भक्तासी आंगिकार

bhavacha bhokta bhaktasi angikar

रचनाकार: संत बोधले · अभंग
भावाचा भोक्ता भक्तासी आंगिकार । आरे तु काज कैवारी अनाथाचा ॥१॥ दिनाच्या धावया कैसा तु धावसी । काहि न पाहसी दोष आमचे ॥२॥ आम्ही तव अपराधी । आहा अनंत कोटी । परि तु धुरजेठी आंगिकारिल ॥३॥ बोधला म्हणे जन्मोजन्मी तुझा आखिला । हा देहे ठेविला तुझे पायी ॥४॥