भजनी मालिका
← भजनांकडे परत

भावाचिये बळे होऊनि लहान । आपुलें थोरपण विसरला

bhavachiye bale houni lahan | apulen thorapan visarala

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भावाचिये बळे होऊनि लहान । आपुलें थोरपण विसरला ॥१॥ न म्हणे यातिकुळ तें सुशीळ । उत्तम चांडाळ हो कां कोण्ही ॥२॥ अट्टाहास्यें करितां नामाचा उच्चार । उतरी पैलपार भवनदीचा ॥३॥ एका जनार्दनीं भक्तांची आवडी । घालीतसे उडी वैकुंठाहुनी ॥४॥