भजनी मालिका

भजने

भीमा दक्षिनवाहिनी । मध्यें पुंडलीक मुनी । विठ्ठल विटे समचरणी । भक्तालांगीं तिष्ठत ॥१॥ न म्हणे लहान थोर कांहीं । याती वर्णा विचार नाहीं । प्रेम भाव पायीं । येवढेंचि पुरे तेथें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भीमातीरीं एक वसविले नगर । त्याचें नांव पंढरपुर रे । तेथील मोकासी चार भुजा त्यासी । बाइला सोळा हजार रे ॥१॥ नाचत जाऊं त्याच्या गांवा रे खेळिया । सुख देईल विसावा रे ।

रचनाकार: संत तुकाराम

भीष्मासी आपण पाडियलें रणीं । गोविंदें निर्वाणीं भेटी दिल्ही ॥१॥ हरिश्वंद्र वाहे डोंबाघरीं पाणी । गोविदें नि-र्वाणीं भेटी दिल्ही ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

भुंकती तीं द्यावीं भुंकों । आपण त्यांचें नये शिकों ॥१॥ भाविकांनीं दुर्जनाचें । कांहीं मानूं नये साचें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

भुंकुनियां सुनें लागे हत्तीपाठी । होऊनि हिंपुटी दुःख पावे ॥१॥ काय त्या मशकें तयाचें करावें । आपुल्या स्वभावें पीडतसे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

भुक्ति आणि मुक्ति फुकाचें ठेवणें । श्रीगुरु जनार्दनें तुच्छ केलें ॥१॥ येर ब्रह्माज्ञाना काय तेथें पाड । मोक्षाचे काबाड वारियेलें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भुक्ति मुक्ति कारणें तुज न घाली सांकडें । संतासी रोकडे शरण जाऊं ॥१॥ हाचि माझा नेम उपासना भक्ति । आणिक विश्रांती मज नाहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भुक्ति मुक्ति सिद्धि यावया कारणें । सेवकासी देणें पांडुरंगा ॥१॥ ऐसिया तुज सांगणें आपणातें म्हणक्ति । तया अधोगति कल्पकोडी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

भुक्तिमुक्तीचा पांग आमुचिये गांवीं । जनीं जनार्दन वागवी देह सर्व ॥१॥ भुक्ति आणि मुक्ति कासया तें वोझें । जनार्दनें सहजें निर्दाळिलें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भुक्तिमुक्तीचें सांकडें नाहीं विष्णुदासां । प्रपंचाची आशा मा तेथें कैची ॥१॥ वैकुंठ कैलास अमरपदें तिन्हीं । तुच्छवत मनी मानिताती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ