भजनी मालिका

भजने

बांधी सोडी हें तों धन्याचिये हातीं । हेंकडें गोविती आपणां बळें ॥१॥ भुललियासी नाहीं देहाचा आठव । धोतऱ्यानें भाव पालटिला ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

बांधूनियां पर्णकुटी मुढी । त्यावरी गुढी अद्वैताची ॥१॥ ऐसें मिरविती सोंग वायां । नरका जावया उल्हासें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

बांधोनियां शिखा हिशोबाचे मिसें । एकनाथ बैसे महाव्दारीं ॥१॥ जातां मार्गावरोनि पाहे निजदृष्टी । होतसे कष्टी रुक्यालागी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

बांधोनियां हात गयाळ मारिती । दंड ते करिती मोक्षासाठीं ॥१॥ गेले ते पितर मोक्षालागीं तुझे । आतां देईं माझे दक्षिणेसी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

बांधोनियां हात गयावळ मारिती। दंड ते करिती मोक्षासाठीं ।।१।। गेले ते पितर मोक्षालागीं तुझे। आतां देई माझे दक्षिणेसी ॥२॥

रचनाकार: संत जनाबाई

बाप आर्तबंधु सकळ जीवनकंदू । भक्तांचा सुखसिंधु पंढरिरावो ॥१॥ हर्षे निर्भर चित्तीं आले निजभुवना । सांगे विवंचना रुक्माईसी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

बाप करी जोडी लेंकराचे ओढी । आपुली कुरवंडी वाळवूनी ॥१॥ एकाएकीं केलों मिरासीचा धनी । कडिये वागवूनी भार खांदीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

बाप तोचि माय होउनी आला पोटीं । जातक वर्णितां गुंती पडली भेटी ॥१॥ बाप कीं माय म्हणावा पुत्र । भुललीया श्रुति करितां वृत्तान्त ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

बाप भक्तप्रिय पाहे कृपादृष्टी । करितसे सुखगोष्टी ब्राह्मणांसी ॥१॥ सर्वभावें शरण सर्वकाळी मज । ते हे भक्तराज सखे माझे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

बारंबार काहे मरत अभागी । बहुरि मरन संक्या तोरेभागी ॥ध्रु.॥ ये हि तन करते क्या होय । भजन भगति करे वैकुंठे जाय ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम

बारा वर्ष बाळपणक गेलें । परि रामराम मुखीं नाहीं आलें ॥१॥ अहा रे मूढा जन्मलासी दगड । गमाविलेंक वाड आयुष्यासी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

बारा सोळा अठरा गडियांचा मेळा । मांडियेला डाव कोण आवरीं तयाला ॥१॥ खेळा भाई विटिदांडु । खेळा भाई विटिदांडु । खेळ खेळतां परी बरा नोहे सहज दांडु ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

बारा सोळाजणी हरीसी नेणती । म्हणोनी फिरती रात्रंदिवस ॥१॥ सहस्त्र मुखांचां वर्णितां भागला । हर्ष जया झाल तेणें सुखें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ