भजनी मालिका
← भजनांकडे परत

बांधोनियां हात गयाळ मारिती । दंड ते करिती मोक्षासाठीं

bandhoniyan hat gayal mariti | dand te kariti mokshasathin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
बांधोनियां हात गयाळ मारिती । दंड ते करिती मोक्षासाठीं ॥१॥ गेले ते पितर मोक्षालागीं तुझे । आतां देईं माझे दक्षिणेसी ॥२॥ बापुडें केंश बोडिती मिशीदाढी । मग दक्षणा हिरडी खातसे हे ॥३॥ फार काय सांगों मेल्याविण मुक्ती । नाहीं ते वांछिती स्वप्न सुख ॥४॥ अनंत जन्म मृत्यु होतां जैसें दु:ख । त्याहूनि अशेष आहे तेथें ॥५॥ भांबावले जन धांवे आटाआटी । सोडूनियां कोटि अनंत पद ॥६॥ नलगे गाळावें नलगे तळावें । नलगे मरावें मुक्तीसाठीं ॥७॥ मुक्ति लागे पायां जाऊनियां पाहे । जीव जातां देह जनी नाहीं ॥८॥