भजनी मालिका

भजने

बाइले अधीन होय ज्याचें जिणें । तयाच्या अवलोकनें पडिजे द्वाड ॥१॥ कासया ते जंत जिताती संसारीं । माकडाच्या परी गारोडयांच्या ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

बाइलेआधीन होय ज्याचें जिणें । तया अधमा नरकीं पेणें ॥१॥ बाईल मनोगतें ऐसा चाले । नावडती कोणाचे तया बोल ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

बाई कौसल्येचा पुत्र । दिसे सर्वांही विचित्र ॥१॥ ऐसें वाटे माझ्या चित्तीं । प्रगटली विष्णुमूर्तीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

बाई मी लिहिणें शिकलें सद्गुरुरायाचाही।। ब्रह्म झाला जो चिनाकार देख पुढे ओंकाराची रेख। तूर्या म्हणावें तिसी ।। १ ।। माया महत्तत्त्वाचें सुभर तीन पांचाचा प्रकार। पुढें पंचविसांचा भार। गणति केली छत्तीसी ।।२।।

रचनाकार: संत जनाबाई

बाईल आधीन होती जे कां नर । ते म्हणों पामर श्वानरूपें ॥१॥ नेणती स्वहित कामाचिया वृत्ती । प्रवृत्ति निवृत्ति सोडोनियां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

बाजारीं बैसोनि सांगें ज्ञान गोष्टी । कथेचि राहाटी वोपावोपी ॥१॥ मेळवोनी जन सांगे निरूपण । वाचे ब्रह्मज्ञान पोटासाठीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

बांधिलें राहीना वैरलें खाईना । दवडिलें जाईना जाणते हो ॥१॥ तय खुंटा नांदावें सौरसें बांधावें । कशानें करावें वोढाळें हो ॥२॥

रचनाकार: संत नामदेव