भजनी मालिका
← भजनांकडे परत

बाप श्रोतियाचा राजा। कैसी उभारिली ध्वजा

bap shrotiyacha raja| kaisi ubharili dhvaja

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
बाप श्रोतियाचा राजा। कैसी उभारिली ध्वजा ।।१।। एक झाला परिक्षिती। ऐसे पवाडे गर्जिती ॥२॥ . भागवत रससुखें । द्रौपदी वाढी सावकाशें ।।३।। ज्याची ऐकतां गर्जना कंप काळाचिया मना ।।४।। सात दिवस वृष्टि झाली। जनी म्हणे मात केली ॥५॥