भजनी मालिका
← भजनांकडे परत

बांधी सोडी हें तों धन्याचिये हातीं । हेंकडें गोविती आपणां बळें

bandhi sodi hen ton dhanyachiye hatin | henkaden goviti apanan balen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बांधी सोडी हें तों धन्याचिये हातीं । हेंकडें गोविती आपणां बळें ॥१॥ भुललियासी नाहीं देहाचा आठव । धोतऱ्यानें भाव पालटिला ॥ध्रु.॥ घरांत रिघावें दाराचिये सोई । भिंतीसवें डोई घेऊनि फोडी ॥२॥ तुका म्हणे देवा गेलीं विसरोन । आतां वर्म कोण दावी यांसी ॥३॥