भजनी मालिका
← भजनांकडे परत

बारा सोळा अठरा गडियांचा मेळा । मांडियेला डाव कोण आवरीं तयाला

bara sola athara gadiyancha mela | mandiyela dav kon avarin tayala

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
बारा सोळा अठरा गडियांचा मेळा । मांडियेला डाव कोण आवरीं तयाला ॥१॥ खेळा भाई विटिदांडु । खेळा भाई विटिदांडु । खेळ खेळतां परी बरा नोहे सहज दांडु ॥२॥ पांच सात बारा नव तेरा यांची नका धरुं गोडी । खेळ खेळता दांत विचकुन पडाल घशींतोंडीं ॥३॥ एका जनार्दनीं काय वाचा शरण रिघां पायीं । खेळ तो अवघा सोपा मग प्रेमा उणें नाहीं ॥४॥