भजनी मालिका

भजने

नको तुझें ज्ञान नको तुझा मान । माझें आहे मन वेगळेची ॥ १ ॥ नको तुझी भुक्ती नको तुझी मुक्ति । मज आहे विश्रांती वेगळीच ॥ २ ॥

रचनाकार: संत सावता

नको दुजी रे वासना । मिठी घाली संतचरणा । पंढरीचा राणा । आपोआपा हृदयीं ॥१॥ हाचि धरी रे विश्वास । सांडी वाउगा हव्यास । नको आशा तृष्णा पाश । परतें टाकी सकळ ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नको नको मना हिंडों दारोदारीं । कष्ट झाले भारी वांयांविण ॥१॥ कल्पना सांडोनि संतासंगें राहीं । सर्व त्यांचे पायीं सुख आहे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नक्र बोले ऐकें ह्रषिकेशी । नाममात्रे तारिलें गजेंद्रासी । काय कृपें झालें मजविशीं । आतां कैसा बा मोकलूनि जासी ॥१॥

रचनाकार: संत नामदेव

नग जों तें सोनें लेण्याजोगें होतें । मुदी कंकण तैं नामें त्यांचीं ॥१॥ मुशीमाजीं जेव्हां गेलें तें मुरोन । जालेसें सुवर्ण अभिन्न तें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नगरीं नरनारी समस्तही । म्हणती झालें कांहीं राजयाला ॥१॥ बाळ तें केवढें धाडीलें वनासी । याचीया धैर्यासी दुजा नाहीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नग्न होवोनियां स्नान जे करिती । त्यांचीं व्रतें होती निरर्थक ॥१॥ त्वरें करूनियां या गे मजपाशीं । सांगतों तुह्मांसी प्रायश्चित ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नंद ह्मणे माझें बुडालें जहाज । अभाग्यासी मज कृष्ण कैचा ॥१॥ काय माझें तप संपूर्ण सरलें । ह्मणोनी बुडालें तान्हें माझें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव