भजनी मालिका
← भजनांकडे परत

नघडुनिया दृष्टि नामा पाहे पोटी

naghaduniya drushti nama pahe poti

नघडुनिया दृष्टि नामा पाहे पोटी । आनंदाची सृष्टि तया जाली ॥ १ ॥ घेरे नाम्या कवळु आनंदाचा होसी । तुजमाजि निवासि हरि आहे ॥ २ ॥ नामा पसरी मुख आनंदला तृप्त । कवळु पूर्णभरित हरिराज ॥ ३ ॥ निवृत्तीने सेविला कवळु हा हरि । तूंचि चराचरीं दिससी आम्हां ॥ ४ ॥