भजनी मालिका
← भजनांकडे परत

नग जों तें सोनें लेण्याजोगें होतें । मुदी कंकण तैं नामें त्यांचीं

nag jon ten sonen lenyajogen hoten | mudi kankan tain namen tyanchin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नग जों तें सोनें लेण्याजोगें होतें । मुदी कंकण तैं नामें त्यांचीं ॥१॥ मुशीमाजीं जेव्हां गेलें तें मुरोन । जालेसें सुवर्ण अभिन्न तें ॥२॥ तैसा ज्ञानदेव भक्त तो मी देव । लौकिक लाघव दासांसाठीं ॥३॥ ज्ञानसमाधी हे नाशी रूप नांवा । अंतींचा मेळावा मजमाजीं ॥४॥