भजनी मालिका
← भजनांकडे परत

नगरीं नरनारी समस्तही । म्हणती झालें कांहीं राजयाला

nagarin naranari samastahi | mhanati jhalen kanhin rajayala

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नगरीं नरनारी समस्तही । म्हणती झालें कांहीं राजयाला ॥१॥ बाळ तें केवढें धाडीलें वनासी । याचीया धैर्यासी दुजा नाहीं ॥२॥ मागें बहु झालें नाहीं हें देखीलें । हें तों नव्हे भलें विचारितां ॥३॥ सर्वांदिकीं त्यासी सांगितली वृत्त । कांरे तूं निवांत बैसलासी ॥४॥ नामा म्हणे राजा ध्रुवापाठीं गेला । कायतो बोलीला ऐका त्यासी ॥५॥