भजनी मालिका

भजने

नरदेह प्रमाण शतवर्षे म्हणती । अभागी घालविती वायां जाण ॥१॥ न करी भजन न जाय पंढरीं । अभाविक दुराचारी सदा मनीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नरदेहा येउनी करावें कीर्तन । वाचे नामस्मरण विठ्ठलाचें ॥१॥ आणिक सायास न करी आळस । सर्वकळ सोस हाचि वाहे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नरदेहा येऊनि गमावी आयुष्य । धरीना विश्वास रामनामीं ॥१॥ अंतकाळीं तया कोणी न ये कामा । वाउगाचि श्रमा पडतो डोहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नरदेहीं आयुष्य गमाविलें सारें । परी रामभजन खरें केलें नाहीं ॥१॥ ऐसें जें अभागी पावती पतनीं । तया सोडवणी कोण करी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नरदेहीं आयुष्य शत तें प्रमाण । अर्ध रात्र जाण जाय मध्यें ॥१॥ बाळत्व तारुण्य जरामय जाया । संपलें गणना होती त्याची ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नरदेही आलिया मुखीं नाम गाय । वायां आयुष्य न जाय ऐसें करी ॥१॥ प्रपंचमृगजळीं गुंतुं नको वायां । कन्या पुत्रादिक या सुख नोहे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नरदेहीं येउनीं करी स्वार्थ । मुख्य साधी परमार्थ ॥१॥ न होतां ब्रह्माज्ञान । श्वान सूकरां समान ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नरदेहीं सुख सोहळा संस्कार । परितेथें विकार दैवयोगें ॥१॥ बालत्वाचें सुख अज्ञान दशेंत । रामनाम मुखांत न ये कधीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नरदेहीचा हाचि मुख्य स्वार्थ । संतसंग करी परमार्थ ॥१॥ आणिक नाहीं पां साधन । मुखीं हरि हरि स्मरण ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नरनारी जातां पंढरीसी । सुकृतांची रासी ब्रह्मा नेणें ॥१॥ अभाव भावना न धरी कल्पना मस्तक चरणावरी ठेवी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नरसिंह मेहता गुजराथी ब्राम्हण । धरिला अभिमान त्याचा तुम्हीं ॥१॥ व्दारकेसी त्याच्या हुंडया भरियेल्या । शोभनासी नेल्या वस्त्रें पेटया ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नरसी मेहता होता सावकार । जुनागडीं घर महा भक्त ॥१॥ वडील तयाचे करिती व्यापार । गजी सावकार द्रव्य धान्यीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नलगे तुझी भुक्ति नलगे तुझी मुक्ति । मज आहे विश्रांति वेगळीच ॥१॥ माझें मज कळलें माझें मज कळलें । माझें मज कळलें प्रेमसुख ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नलगे भुक्तिमुक्ति नलगे स्वर्गवास । नको वैकुंठावास देवराया ॥१॥ नलगे योगयाग अष्टांग साधन । न चुकें बंधन येणें कांहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ