भजनी मालिका
← भजनांकडे परत

नग्न होवोनियां स्नान जे करिती । त्यांचीं व्रतें होती निरर्थक

nagna hovoniyan snan je kariti | tyanchin vraten hoti nirarthak

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नग्न होवोनियां स्नान जे करिती । त्यांचीं व्रतें होती निरर्थक ॥१॥ त्वरें करूनियां या गे मजपाशीं । सांगतों तुह्मांसी प्रायश्चित ॥२॥ एकी आड एक गुह्यस्थानीं हात । आनंद बहूत मनामध्यें ॥३॥ करा नमस्कार सांगे वनमाळी । एक हस्त भाळीं लविताती ॥४॥ देवां द्बिजां ऐसा करितां नमस्कार । पाप याचें फार धर्मशास्त्रीं ॥५॥ ऐकोनियां ऐसें लाज सोडोनियां । पडताती पायां आदित्याच्या ॥६॥ वस्त्रें देत तेव्हां तयां जगजीवन । मनोरथ पूर्ण करीन मी ॥७॥ नामा ह्मणे येती गोकुळासी नारी । चालिला श्रीहरि तेथुनियां ॥८॥