भजनी मालिका
← भजनांकडे परत

दोहींकडे दोही जाया मध्ये गोरोबाची शय्या

dohinkade dohi jaya madhye gorobachi shayya

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
दोहींकडे दोही जाया मध्ये गोरोबाची शय्या ।।१।। गोरा निद्रिस्त असतां कपट करिती त्याच्या कांता ॥२॥ गोरोबाचे दोन्ही हात आपुल्या हृदयावरी ठेवित ।।३॥ जागा झाला गोरा भक्त। जनी म्हणे त्या निद्रित ॥४॥