भजनी मालिका
← भजनांकडे परत

दोष दुरितांचें पाळें । पळती बळें नाम घेतां

dosh duritanchen palen | palati balen nam ghetan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
दोष दुरितांचें पाळें । पळती बळें नाम घेतां ॥१॥ नाम प्रताप गहन । भवतारण हरिनाम ॥२॥ आणीक नको दुजी चाड । नाम गोड विठ्ठल ॥३॥ एका जनार्दनीं नाम । तरले तरती निष्काम ॥४॥