भजनी मालिका
← भजनांकडे परत

दोन्ही हात ठेवुनि कटीं । उभा भीवरेच्या तटीं । कष्टलासी साठी । भक्तीकाजें विठ्ठला

donhi hat thevuni katin | ubha bhivarechya tatin | kashtalasi sathi | bhaktikajen viththala

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
दोन्ही हात ठेवुनि कटीं । उभा भीवरेच्या तटीं । कष्टलासी साठी । भक्तीकाजें विठ्ठला ॥१॥ भागलासी मायबापा । बहु श्रम केल्या खेपा । आह्मालागीं सोपा । दैत्या काळ कृतांत ॥ध्रु.॥ होतासी क्षीरसागरीं । मही दाटली असुरीं । म्हणोनियां घरीं । गौळियांचे अवतार ॥२॥ केला पुंडलिकें गोवा । तुज पंढरीसि देवा । तुका म्हणे भावा । साठी हातीं सांपडसी ॥३॥