भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवासी लागे सकळांसी पोसावें । आम्हां न लगे खावें काय चिंता

devasi lage sakalansi posaven | amhan na lage khaven kay chinta

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देवासी लागे सकळांसी पोसावें । आम्हां न लगे खावें काय चिंता ॥१॥ देवा विचारावें लागे पापपुण्य । आह्मासी हे जन अवघें भलें ॥ध्रु.॥ देवासी उत्पत्ती लागला संहार । आम्हां नाहीं फार थोडें काहीं ॥२॥ देवासी काम लागला धंदा । आह्मासी ते सदा रिकामीक ॥३॥ तुका म्हणे आम्ही भले देवाहून । विचारितां गुण सर्वभावें ॥४॥