भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवें समाधान केलें अवघेजण । चला आचमना गौतमीसी

deven samadhan kelen avaghejan | chala achamana gautamisi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देवें समाधान केलें अवघेजण । चला आचमना गौतमीसी ॥१॥ वद्य त्रयोदशी दिधली समाधी । महोत्सव गोविंदीं समर्पिला ॥२॥ गर्जती वैष्ण विठोबाच्या नामा । थोर तुझा महिमा दिनबंधु ॥३॥ समाधि प्रदक्षिणा केली अवघींजणीं । जाली बोळवणी चांगयाची ॥४॥ कीर्तन करीत आले गौतमीसी । देव मुनि ऋषि आंचवले ॥५॥ अवघ्यांनीं आचमनें केलीं गोदातीरीं । नामा म्हणे हरी आतां उठा ॥६॥