भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवी देव झाले भोग सरले यावरी । सांगाया दुसरी ऐसी नाहीं उरली

devi dev jhale bhog sarale yavari | sangaya dusari aisi nahin urali

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देवी देव झाले भोग सरले यावरी । सांगाया दुसरी ऐसी नाहीं उरली ॥१॥ हरीनाम देवनाम तुम्ही गाऊनियां जागा । पेंठवणी मागा नका ठेवूं लिगाड ॥ध्रु.॥ शेवटीं सुताळी बरवी वाजवावी डांक । ताळा घाली एक सरलियाचे शेवटीं ॥२॥ गुंडाळा देव्हारा मान देती मानकरी । तुका म्हणे बरीं आजि कोडीं उगविलीं ॥३॥