भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवो म्हणती रुक्मिणी । हा येचि युगीं देखिला नयनीं

devo mhanati rukmini | ha yechi yugin dekhila nayanin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देवो म्हणती रुक्मिणी । हा येचि युगीं देखिला नयनीं । हेंचि ज्ञानसंजीवनी । जाण त्रैलोक्यासीम ॥१॥ धन्य धन्य धरातळीं । जो यातें दृष्टीं न्याहाळी । तो वात येईल टाळी । वैकुंठ भुवनासी ॥२॥ जो करील याची यात्रा । तो तारील सकळ गोत्रां । सकळही कुळ पवित्रा । याचेंनि दरुषणें होती ॥३॥ आळंकापुरीं हें शिवपीठ । पूर्वीं येथें होते नीळकंठ । ब्रह्मादिकीं तप वरिष्ठ । येथेंचि पैं केलें ॥४॥ इंद्र येऊनियां भूमीसी । याग संपादिले अहर्निशीं । इंद्रायणीं इदोरिसी । या पासोनि पंचक्रोशी ॥५॥ येथें त्रिवेणी गुप्त वसे । भैरवापासूनि भागीरथी बसे । पूर्ववटि माया दिसे । ते प्रत्यक्ष जाण पार्वती ॥६॥ भोवतें वनवल्लिवृक्ष । येथें देव येउनी होताती पक्ष । हे असे नित्य साक्ष । अस्थी नासती उदकीं ॥७॥ पंढरीहुनी हें सोपें । जनाचीं हरावया पापें । कळिकाळ कोपलिया कोपें । त्याचें न चले आळंकापुरीसी ॥८॥ ऐसें सांगतां हरिसी । प्रेम ओसंडलें रुक्मिणीसी । म्हणे धन्य धन्य जयाचे कुसीं । ज्ञानदेव जन्मले । नामा म्हणे माझा स्वामी । सवें संतसमागमीं । ऐसेम सांगितलें ग्रामीं । आळंकापुरीसी ॥१०॥