भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवें भक्तालागीं उपचार मांडिले । शांति सुखसनी मागें बैसविलें । धरुनि तन्मयाचीं छत्रें गौरविलें । ज्ञानसंपत्तीचे दळभार दिधले

deven bhaktalagin upachar mandile | shanti sukhasani magen baisavilen | dharuni tanmayachin chhatren gauravilen | dnyanasampattiche dalabhar didhale

रचनाकार: संत निळोबा · अभंग
देवें भक्तालागीं उपचार मांडिले । शांति सुखसनी मागें बैसविलें । धरुनि तन्मयाचीं छत्रें गौरविलें । ज्ञानसंपत्तीचे दळभार दिधले ॥१॥ सुखें राज्य करा म्हणे त्रिमुवनीं । माझें ऐश्वर्य हें सर्वांगी लेंउनी । मिरवा भूषणें हीं यश कीर्ति दोन्हीं । माझीं आयुधें हीं देतों संतोषोनी वो ॥२॥ शांती विरक्ती हे मूर्तिमंत दया । क्षमा नित्यानंदें तुम्हां अर्पिलिया । अखंड नैराश्यता सेवे तुमचिया । ठेविली निकट वासें नवजती आन ठाया वो ॥३॥ निळा म्हणे ऐसा भक्तांचा समुदाय । देवैं आनंदविला प्रीतीच्या उत्साहें । म्हणे निर्भय असा जवळीच मी आहें । भोगा सुख माझें निजाचें अव्दय वो ॥४॥