भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवासी प्रिय होय कीर्तन । नाचे येऊन आनंदे

devasi priy hoy kirtan | nache yeun anande

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देवासी प्रिय होय कीर्तन । नाचे येऊन आनंदे ॥१॥ न विचारी यतीकुळ । असोत अमंगळ भलतैसे ॥२॥ करिती कीर्तन अनन्यभावें । ते पढिये जीवेंभावें ॥३॥ शरण एका जनार्दनीं । कुळें पावन होती कीर्तनीं ॥४॥