भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुजेंपणें पाहे तरी देवाचे चरण । आणि तें कीर्तन वैष्णवांचें

dujempanen pahe tari devache charan | ani ten kirtan vaishnavanchen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
दुजेंपणें पाहे तरी देवाचे चरण । आणि तें कीर्तन वैष्णवांचें ॥१॥ कीर्तनीं नाचती हरिदास प्रेमें । दुजेपणा नेमें हारुनी जाय ॥२॥ एका जनार्दनीं दुजेपणा टाकुणी । वासुदेवचरणीं लीन होई ॥३॥