भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुबळ्यांसी धन । सांपडलिया नोहे जतन । अभाविकांसी नाम जाण । तैशा रीतीं

dubalyansi dhan | sampadaliya nohe jatan | abhavikansi nam jan | taisha ritin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
दुबळ्यांसी धन । सांपडलिया नोहे जतन । अभाविकांसी नाम जाण । तैशा रीतीं ॥१॥ धनलोभीयाचे परी । जैसें चित्त धनावरी । तैसें हृदया माझारीं । नाम जप ॥२॥ कामी पुरुषाचें ध्यान । तया न कळे आप्तजन । जैसा पारध्याधीन । मृग होय ॥३॥ अभाविकाचे बोल । नव्हती ते फोल । एका जनार्दनीं मोल । तया नाहीं वेंचत ॥४॥