भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुधाचे घागरी मद्याचा हा बुंद । पडिलिया शुद्ध नव्हे मग

dudhache ghagari madyacha ha bund | padiliya shuddha navhe mag

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
दुधाचे घागरी मद्याचा हा बुंद । पडिलिया शुद्ध नव्हे मग ॥१॥ तैसे खळां मुखें न करावें श्रवण । अहंकारें मन विटाळलें ॥ध्रु.॥ काय करावीं तें बत्तीस लक्षणें । नाक नाहीं तेणें वांयां गेलीं ॥२॥ तुका म्हणे अन्न जिरों नेदी माशी । आपुलिया जैसी संसर्गे ॥३॥