भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुबळें सदैवा । म्हणे नागवेल केव्हां

dubalen sadaiva | mhane nagavel kevhan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
दुबळें सदैवा । म्हणे नागवेल केव्हां ॥१॥ आपणासारिखें त्या पाहे । स्वभावासी करिल काये ॥ध्रु.॥ मूढ सभे आंत । इच्छी पंडिताचा घात ॥२॥ गांढें देखुनि शूर । उगें करि बुरबुर ॥३॥ आणिकांचा हेवा । न करीं शरण जाई देवा ॥४॥ तुका म्हणे किती । करूं दुष्टाची फजिती ॥५॥