भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुरकु अंबुला केलागे बाई

duraku ambula kelage bai

दुरकु अंबुला केलागे बाई । ब्रह्मादिकां तो न पडे ठाई ॥१॥ हालों नये चालों नये । सैरावरा कांही बोलों नये ॥२॥ अंबुला केला धावे जरि मन । बुडती बेताळीस जाती नाक कान ॥३॥ मागील केलें तें अवघें वावो । बापरखुमादेविवरु विठ्ठल नाहो ॥४॥