भजनी मालिका

भजने

दीनाचें उपार्जन करी पोटासाठीं । म्हणे मज लंगोटी द्याहो कोण्हीं ॥१॥ घेउनी संन्यास हिंडे दारोदारी । ‘ नारायण ‘ करी पोटासाठी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

दीनानाथा तुझीं ब्रिदें चराचर । घेसील कैवार शरणागता ॥१॥ पुराणीं जे तुझे गर्जती पवाडे । ते आम्हां रोकडे कळों आले ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

दीप घेउनियां धुंडिती अंधार । भेटे हा विचार अघटित ॥१॥ विष्णुदास आम्ही न भीओ कळिकाळा । भुलों मृगजळा न घडे तें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

दीपकाचे ठायीं नाहीं द्वैतभाव । चोर आणि साव सारखाची ॥१॥ तैसं ब्रह्माज्ञान । सांगताती गोष्टी । अभाविका पोटीं स्थिर नोहे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

दीपांचें तें तेज कळिकें ग्रासिले । उदय अस्त ठेले प्रभेविण ॥१॥ लोपलीसे प्रभा तेजाचे तेजस । जाहली समरस दीपज्योती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

दु:खरूप देह दु:खाचा संसार । सुखाचा विचार नाहीं कोठें ॥१॥ कन्या पुत्र बाळें सुखाचे सांगाती । दु:ख होतां जाती आपोआप ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

दु:खाची निव्रुत्ति सुखाचे तें सुख । पाहतां श्रीमुख गोविंदाचें ॥१॥ रंगणीं रांगत गुलगुला बोलत । असूर रुळत चर- णातळीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

दुःख वाटे ऐसी ऐकोनियें गोष्टी । जेणें घडे तुटी तुझ्या पायीं ॥१॥ येतो कळवळा देखोनियां घात । करितों फजित नाइकती ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम