भजनी मालिका

भजने

दिवसरात्रीं हाचि धंदा । वर्णितों गोविंदा गुणकीर्ति ॥१॥ स्वप्नामाजी सुषुप्ती आंत । जागृतीये मात याचाचि ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

दिव्य तेज झळकती रत्नकीळा फांकती अगणीत लावण्या तेज प्रभा दिसती गे माये ॥१॥ कानडा वो सुंदर रुपडा गे । अंतरीं बाहेरीं पाहतां दिसे उघडा गे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

दिशा फेरफेरे कष्टशील सैरा । किती येरझारा कल्प-कोटी ॥१॥ विठ्ठलाचे नामीं दृढ धरीं पाव । येर सांडीं वाव मृग-जळा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

दिसंदिस कैसा झालासी शहणा । गोवळांसी खेळसी पंढरीच्या राण्या ॥१॥ विश्वामाजी तुझे बोभाट मोठे । जन्ममरणाचे संकल्प तुटे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

दिसें तें नासेल सर्वत्र जाणती। या बोला व्युत्पत्ति काय काज ।। काज कारण हा विवेक पाहिजे । तरीच लाहिजे शाश्वतासी ।।

रचनाकार: संत रामदास

दिसे तोचि जनीं वनीं । विठ्ठल ह्रदयीं त्रिभुवनीं ॥१॥ लेणें नेसणें भूषणें । विठ्ठल वस्त्रें परिधानें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

दिसे सगुण परि निर्गुण । आगमां निगमां न कळे महिमान । परा पश्यंती खुटलीया जाण । त्यांचे न कळे शिवाजी महिमान ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

दिसे सगुण हा स्वरुपसुंदर । परि व्यापूनियां ठेला चराचर । देवादानचादि मानव असुर । याविण उरला ऐसा नाहीं तृणांकुर वो ॥१॥ ऐशा गौळणी त्या अनुवाद करिती ज्या ज्या रंगलिया याच्या अनुवृत्ती । रजनीं दिवो जयां याचीचि संगती । त्या त्या स्वानुभवें आपुल्या बोलती वो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

दीन म्हणोनी नाच रे कीर्तनीं । तेणें चक्रपाणी करी कृपा ॥१॥ अनाथाचा नाथ पतीतपावन । म्हणोनी कीर्तन तया गोडी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ