भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्या सुखाकारणें देव वेडावला । वैकुंठ सांडुनीं संतसदनीं राहिला

jya sukhakaranen dev vedavala | vaikunth sandunin santasadanin rahila

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ज्या सुखाकारणें देव वेडावला । वैकुंठ सांडुनीं संतसदनीं राहिला ॥१॥ धन्य धन्य संतांचें सदन । जेथें लक्ष्मीसहित शोभे नारायण ॥२॥ सर्व सुखांची सुखराशी । संतचरणीं भुक्तिमुक्ति दासी ॥३॥ एका जनार्दनीं पार नाहीं सुखा । म्हणोनि देव भुलले देखा ॥४॥