भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्या नामे पाषाण जळांत तरलें । नाम त्या रक्षिलें प्रल्हादासी

jya name pashan jalant taralen | nam tya rakshilen pralhadasi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ज्या नामे पाषाण जळांत तरलें । नाम त्या रक्षिलें प्रल्हादासी ॥१॥ अग्नि विष बाधा नामेंचि निवारीं । गिरीं आणि कंदरें रक्षी नाम ॥२॥ ब्रह्महत्यारी वाल्हा नामेंचि तरला । त्रैलोकीं मिरवला बडिवार ॥३॥ एका जनार्दनीं नामेंचि तरलें । जडजीव उद्धरिलें युगायुगीं ॥४॥