भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्या नामें अनंत न कळे संकेत

jya namen anant na kale sanket

ज्या नामें अनंत न कळे संकेत । वेदाचाही हेत हारपला ॥१॥ तें रूप सानुलें यशोदे तान्हुलें । भोगिती निमोले भक्तजन ॥२॥ अनंत अनिवार नकळे ज्याचा पार । जेथें चराचर होतें जातें ॥३॥ निवृत्तिसंकेत अनंताअनंत । कृष्णनामें पंथ मार्ग सोपा ॥४॥