भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्या रूपाकारणें देव वोळंगणे

jya rupakaranen dev volangane

ज्या रूपाकारणें देव वोळंगणे । योगी गुरुखुणें सेविताती ॥ १ ॥ ते रूप गोकुळीं गोपाळांचे मेळीं । अखंड त्यामेळीं खेळतुसे ॥ २ ॥ ब्रह्मांड कडोविकडी ब्रह्मांड घडी । या योग परवडी हरपती ॥ ३ ॥ निवृत्तीचे धन ब्रह्म हें रोकडें । गौळणी त्यापुढें खेळविती ॥ ४ ॥