भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्या रूपा कारणें वोळंगति सिद्धि

jya rupa karanen volangati siddhi

ज्या रूपा कारणें वोळंगति सिद्धि । हरपती बुद्धी शास्त्रांचिया ॥ १ ॥ तें रूप साजिरें गोकुळीं गोजिरें । यशोदे सोपारें कडिये शोभे ॥ २ ॥ न संटे त्रिभुवनीं नाकळे साधनीं । नंदाच्यां आंगणीं खेळे हरी ॥ ३ ॥ निवृत्ति निधडा रूप चहूं कडा । गोपाळ बागडा गोकुळीं वसे ॥ ४ ॥