भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाणोंनि नेणते नेणत्या मागते

janonni nenate nenatya magate

जाणोंनि नेणते नेणत्या मागते । आपण पुरते नित्यपूर्ण ॥१॥ तें स्वरूप कृष्ण गौळियाच्या भाग्यें । नंदासि सौभाग्य भागा आलें ॥२॥ जाणते पूर्णता पूर्णतां समता । आपण चित्साता गोंपवेष ॥३॥ निवृत्ति परिमाण सर्वपूर्णघन । दिननिशी घन कृष्ण भाग्ययोगें ॥४॥