भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाणे त्याचें वर्म नेणे त्याचें कर्म । केल्याविण धर्म नेणवती

jane tyachen varma nene tyachen karma | kelyavin dharma nenavati

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जाणे त्याचें वर्म नेणे त्याचें कर्म । केल्याविण धर्म नेणवती ॥२॥ मैथुनाचें सुख सांगितल्या खून । अनुभवाविण कळो नये ॥२॥ तुका म्हणे जळो शाब्दिक हें ज्ञान । विठोबाची खूण विरळा जाणे ॥३॥