भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाणोनियां मनोभाव । केला सर्व परिपूर्ण

janoniyan manobhav | kela sarva paripurna

रचनाकार: संत निळोबा · अभंग
जाणोनियां मनोभाव । केला सर्व परिपूर्ण ॥१॥ ऐसेचि तुम्ही कृपासिंधु । दीनबंधु सर्वदां ॥२॥ करुनियां कृपादृष्टी । केली वृष्टी अमृतें ॥३॥ निळा म्हणे देउनी वर । मतिविस्तार वाढविला ॥४॥