भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाणोनियां मनोगत । ठेवा हात मस्तकीं

janoniyan manogat | theva hat mastakin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
जाणोनियां मनोगत । ठेवा हात मस्तकीं ॥१॥ करा माझें समाधान । देऊनि वचन अभयाचें ॥२॥ आहे देवा तुम्हां हातीं । उगवूं गुंती जाणतां ॥३॥ निळा म्हणे वचनाधीन । नारायण तुमचिया ॥४॥